रा.सु.सल्‍लागार नारायणन् यांचा राजीनामा

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:18 IST)
मुंबईतील हल्‍ल्‍यानंतर दिल्‍लीतील हालचाली तीव्र झाल्‍या असून गृह‍मंत्री शिवराज पाटील यांच्‍या राजीनाम्‍यानंतर राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार एम.के.नारायणन् यांनीही आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सोपविला आहे. पंतप्रधान कार्यालयाने मात्र तो अद्याप मंजूर झाला नसल्‍याचे जाहीर केले आहे.

एम.के.नारायणन हे पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार म्‍हणून गेल्‍या साडेचार वर्षांपासून कार्यरत होते. सुरक्षा यंत्रणेच्‍या अपयशाची नैतिक जबाबदारी स्‍वीकारून त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्‍यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या काळात राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार पदी असलेले ब्रिजेश मिश्रा यांना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी भेटीसाठी बोलावल्‍याने या जागी त्‍यांची निवड होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

दरम्‍यान, नारायणन यांचा राजीनामा अद्याप स्‍वीकारला गेला नसल्‍याचे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा