मुंबईतील हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांनी नरीमन हाऊस नावाच्या घरात मुक्काम केला असल्याची माहिती समोर आली असून छाबडा हाऊस नावानेही ओळखल्या जाणा-या या घरात काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे 12 बोटींमध्ये चार-चारच्या गटाने हे दहशतवादी आल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
एका यहुदी दाम्पत्याच्या मदतीने या दहशतवाद्यांनी येथे मुक्काम केला होता. या घरात काल सुमारे 100 किलो चिकन आणि काही किलो सुकामेवा मागविला गेल्याची माहिती आहे.