मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शिवाजी पार्क स्मशामभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आणि हजारो लोकांच्या उपस्थित त्यांच्यावर मुलगा आकाश याने अंत्यसंस्कार केले.
मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या या बलीदानाने संपूर्ण देश काही काळासाठी स्तब्ध झाला होता. त्यांची अमेरिकेत वास्तव्यास असलेली मुलगी येणार असल्याने त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या शहीद अधिका-याला बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.