येस बँकेचे अध्यक्ष ओबेरॉयमध्ये ठार

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:07 IST)
दहशतवाद्यांनी ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकीत हॉटेल्सवर दहशतवादी हल्ला केला. तेव्हा, ओबेरॉय हॉटेलमध्ये उपस्थित असलेले येस बँकेचे अध्यक्ष अशोक कपूर यांचा मृत्यू झाला.

आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढण्‍यात आला. बुधवारी रात्रीपासून तब्बल 40 तास सुरू असलेल्या थराररनाट्याचा आज अंत झाला.

या हल्ल्यात 195 जण ठार झाले असून 287 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर ओबेरॉयमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये कपूर यांच्या मृतदेहाचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा