मेजर उन्नीकृष्णन यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार

वार्ता

सोमवार, 3 मे 2010 (16:06 IST)
PTI
मुंबईत ताज हॉटेलमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्‍यावर शनिवारी संपूर्ण सैन्य सम्मानासह अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

सेनादलाच्‍या जवानांनी यावेळी बंदुकीच्‍या फैरी झाडून त्‍यांना सलामी दिली. देशासाठी प्राणांची आहुती देणा-या या शूर जवानाला शेवटचा निरोप देण्‍यासाठी हजारो लोक उपस्थित होते. 31 वर्षीय मेजर संदीप यांना श्रद्धांजली देण्‍यासाठी शालेय विद्यार्थी, हवाईदल आणि सैनिक उपस्थित होते.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येद्दयुरप्पा, त्‍यांचे मंत्रीमंडळातील सहकारी, सेना आणि पोलीसदलातील मुख्‍य अधिकारी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा