'भारताने आपला राग शांत करावा'

भाषा

सोमवार, 3 मे 2010 (16:11 IST)
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतरही भारताने आपल्‍या नागरिकांचा क्रोध आणि असंतोष शांत करावा. हे दोन्‍ही देशांच्‍या हिताचे राहील आणि शांतता बनून राहण्‍यास मदतीचे ठरेल असा मुर्दाड समज देण्‍याचा प्रयत्‍न पाकिस्‍तानने केला आहे.

मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारतीय जनतेत मोठ्या प्रमाणावर पाकबद्दलचा राग वाढत चालला असून अमेरिकेप्रमाणे पाकिस्‍तानच्‍या हद्दी घुसून भारताने दहशवाद्यांचा खात्‍मा करावा अशी मागणी वाढत चालली आहे.

पाकिस्तानचे परराष्‍ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले, की दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळत असल्‍याचे वारंवार सांगितले जात असल्‍याने भारतीयांच्‍या मनात पाकबद्दल घृणा वाढत चालली असून हे दोन्‍ही देशांच्‍या शांतता प्रक्रियेत अडचणी आणून सीमेवरील तणाव वाढविण्‍यास कारणीभूत ठरत आहे. हे थांबवून भारताने आपला राग शांत करावा.

वेबदुनिया वर वाचा