पंतप्रधानांच्‍या बैठकीचे शिवराजना निमंत्रण नाही

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (15:58 IST)
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतरच्‍या घटनांवर महत्‍वाच्‍या धोरणासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्‍या निवासस्‍थानी बैठक बोलावली असून या बैठकीस गृहमंत्री शिवराज पाटील यांना बोलावलेले नसल्‍याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत डॉ. सिंह यांनी तिन्‍ही सैन्‍यदलाच्‍या प्रमुखांना बोलावले असून आयबी प्रमुखांसह सर्वच तपास यंत्रणांच्‍या प्रमुख अधिका-यांना बोलावण्‍यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा या विषयाशी संबंधित सर्व विषय पंतप्रधानांनी आपल्‍या हातात घेतले असून गृहमंत्री शिवराज पाटील यांना बाजुला लोटण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत गृहमंत्री पाटील यांच्‍या घरी बैठक सुरू असतानाच पंतप्रधानांनी ही बैठक बोलावली असून हे अधिकारी पाटील यांच्‍या सोबतची बैठक अपूर्ण सोडून पंतप्रधानांच्‍या बैठकीस रवाना झाले.

वेबदुनिया वर वाचा