दहशतवादी पाकिस्‍तानी असल्‍याचे सिध्‍द

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (14:26 IST)
गेल्‍या 19 तासांपासून संपूर्ण देशाला खिळवून ठेवलेले दहशतवादी पाकिस्‍तानी असल्‍याची कबुली अटक केलेल्‍या एका दहशतवाद्याने दिली आहे. या दहशतवाद्यांकडे असलेली कागदपत्रे आणि शस्‍त्रास्‍त्र पाकिस्‍तानी सैन्‍याकडे असतात तशाच प्रकारची आहेत.

मुंबईत बुधवारी ताज व ओबेरॉय हॉटेलसह अकरा भागांमध्‍ये दहशतवाद्यांनी हल्‍ले केले होते. यावेळी मुंबई पोलीस व एटीएसने सात जणांना अटक केली होती. अटक केलेल्‍यांपैकी एकाने दिलेल्‍या माहितीनुसार या हल्‍ल्‍यात दहा पाकिस्‍तानी दहशतवादी सहभागी आहेत. तर दहशतवाद्यांना पाकिस्‍तानात प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा