मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला ही दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड यांची संयुक्त कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी मात्र अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा कुठून मिळाला यासंदर्भात अद्याप बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. आजवर मुंबईत यापूर्वी कधीही फिदाईन (समोरा-समोर) हल्ला झालेला नाही. हे विशेष.