आईचे प्रेम नशीब बदलू शकतं

शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (16:28 IST)
एके दिवशी थॉमस अल्वा एडिसन शाळेतून घरी आले आणि शाळेतून मिळालेला पेपर आईला देताना म्हणाले, "आई, माझ्या शिक्षिकेने मला हे पत्र दिले आहे आणि सांगितले आहे की ते फक्त तुझ्या आईला दे, आई सांग, असे यात काय लिहिले आहे? हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता आहे.
 
मग पेपर वाचताना आईचे डोळे पाणावले आणि पत्र वाचताना हळू आवाजात ती म्हणाली, “तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याच्या प्रतिभेसमोर ही शाळा खूपच लहान आहे आणि आमच्याकडे इतके पात्र 
 
शिक्षक नाहीत. त्याला चांगले शिक्षण द्या, तुम्ही त्याला स्वतः शिकवा किंवा त्याला आमच्या शाळेपेक्षा चांगल्या शाळेत शिकायला पाठवा.” हे सर्व ऐकून एडिसनला स्वतःचा अभिमान वाटू लागला आणि तो त्याच्या आईच्या देखरेखीखाली त्याचा अभ्यास करू लागला.
 
पण एडिसनच्या आईच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी एडिसन एक महान शास्त्रज्ञ बनला आणि एके दिवशी घरातील खोल्या साफ करत असताना त्याला कपाटात ठेवलेले एक पत्र सापडले जे त्याने उघडले आणि वाचायला सुरुवात केली त्यात लिहिले होते की "तुमचा मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी आहे. त्यामुळे त्याचे पुढील शिक्षण या शाळेत होऊ शकत नाही, त्यामुळे त्याला आता शाळेतून काढून टाकले जात आहे" हे वाचून एडिसन भावूक झाला आणि मग त्याने आपल्या डायरीत लिहिले की "थॉमस एडिसन हा मानसिक आजारी मुलगा होता पण त्याच्या आईने त्याला घडवलं आणि शतकातील सर्वात प्रतिभावान व्यक्ती बनवलं. 
 
नैतिक शिक्षण :-
आयुष्यात आपण काय आहोत, आपण कसे आहोत हे महत्त्वाचे नाही, पण आईचे प्रेम आणि जिव्हाळा असेल तर मानसिक आजार असलेल्या मुलाचे भवितव्य आणि नशीबही बदलू शकते आणि आईच्या आचरणामुळे मूल जगातील सर्वात महान व्यक्ती बनते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती