मातृदिन विशेष 2021: शास्त्रात आढळतात 16 प्रकारच्या मातांचे वर्णन

रविवार, 9 मे 2021 (12:05 IST)
संकटाच्या वेळी आपल्या तोंडी आपोआपच आई,मम्मी,बेबे,माँ  जे देखील आपण आपल्या आईला संबोधित करतो. तो शब्द बाहेर पडतो तेव्हा जाणवतं की आपल्या आईला देखील किती त्रास होत असेल. हे कोणते तार आहे जे आपल्या आई पर्यंत पोहोचतात.आई आपल्या लेकराच्या मनातले सर्व ओळखते तिला काहीच सांगायची गरज पडत नाही,ती आपल्या लेकरांचा चेहरा बघून सर्व काही समजते. 
आई हा शब्द खूपच प्रेमळ आणि बहुव्यापक आहे. जन्मदात्री आई गर्भावस्थेत आपल्या बाळाचे पोषण करते म्हणून तिला श्रेष्ठ मानले आहे. परंतु ती मुलांचे संगोपन करते त्यांचे पालन पोषण करते त्याचे महत्त्व शंभर पटीने जास्त आहे. कर्णाची आई राधा आणि कृष्णाची आई यशोदा याचे पुरावे आहे. 
या संपूर्ण जगात आईच अशी व्यक्ती आहे जिचे प्रेम आपल्या लेकरांवर जन्मापासून मृत्यू पर्यंत एक सारखे असते. आईची नेहमी हीच इच्छा असते की तिची लेकरं निरोगी ,उदंड आयुष्याची,खरे आणि सर्वगुण संपन्न व्हावी. 
आईचे प्रेम मानवापुरतेच मर्यादित नाही तर तिचे प्रेम प्राणी, पक्षी, जलचर, थलचर सर्वात असते. घरात पक्ष्यांनी बनवलेल्या घरट्यात अंडी दिल्यावर त्यांना काही दिवस आई उकळवते.पिल्ले बाहेर निघाल्यावर त्यांना चोचीत दाणे देते. ती हे बघण्यासाठी आनंदित असते पिल्ल्यांना पंख फुटतात आणि ते स्वतंत्ररित्या दाणा खाई पर्यंत ती त्याच्याकडे लक्ष देते. नंतर ती त्यांना मोकळे सोडते. त्याच प्रमाणे गायी,म्हशी, मेंढरे, शेळी,मांजर, कुत्री देखील आपल्या मुलांची बाहेरच्या आपत्ती पासून संरक्षण करतात. ते आपल्या मुलांकडे तो पर्यंत लक्ष देतात जो पर्यंत ते स्वावलंबी होत नाही. 
माकडी तर आपल्या लेकराच्या प्रेमात इतकी बांधलेली असते की तिचे बाळ मेल्यावर देखील ती त्याला आपल्या छातीशी कवटाळून ठेवते. 
बऱ्याच वेळा असे आढळते की आई कमकुवत आणि अशक्त असल्यावर देखील आपल्या मुलासाठी लढा देते त्याला वाचविण्यास देखील मागे येत नाही. मग त्यामध्ये ती यशस्वी हो किंवा अपयशी. 
'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी'- आई नावाचे माहात्म्य असेच आहे. आईची सेवा करणे सर्व देवांच्या सेवे पेक्षा सर्वोपरी आहे. 
 
वेदशास्त्रात सोळा प्रकारच्या  मातांचे वर्णन केले आहे.दूध पाजणारी, गर्भधारण करणारी,अन्न देणारी, गुरु पत्नी,इष्टदेवांची पत्नी,सावत्र आई, सावत्र आईची मुलगी,सक्खी मोठी बहीण,स्वामीची पत्नी, सासू, आजी(आईची आई),आजी (वडिलांची आई),सख्ख्या मोठ्या भावाची पत्नी,माउशी,आत्या,मामी . 
आजच्या कोरोनाच्या संकट काळात देखील मातांचे धाडसी रूप बघायला मिळत आहे. ज्यासाठी त्यांच्या प्रति अभिवादन श्रद्धेने भरून जाते. हे सिद्ध झाले आहे की जगाच्या पाठीवर कुठेही आई एक सारखीच असते. 
पोलीस,डॉक्टर, परिचारिका,सफाई कामगार,मीडिया कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कामगार,सेवेत नसताना दुसऱ्यांसाठी निस्वार्थ पणे सेवा करत आहे. त्यांना चरणी लोटांगण घालण्याची इच्छा होते. आपल्या नोकरीसह घराची देखील जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडणाऱ्या या मातृशक्तीला मातृदिनाच्या निमित्ताने आदरपूर्वक वंदन .
अशा असंख्य माता आहे ज्यापैकी काहींनी हज जाण्यासाठीचे साचवलेले पैसे,तर कोणी आपली संपूर्ण पेंशन दान केली.तर एखाद्या ने दररोज अन्नाचे वाटप केले,तर कुणी मास्क बनवून किंवा इतर मार्गाने मदत पुरविण्याचे महान कार्य केले. त्या आपल्या परिवारासह देशासाठी देखील 
कोरोना साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी देशाची सेवा करीत आहे. त्यांच्या या संघर्षासाठी आणि त्यांच्या निस्वार्थ वात्सल्य आणि जबाबदाऱ्यांचा प्रति समर्पणाची जाणीव असणाऱ्या या सर्व मातांना हृदयापासून आभार आणि त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा.
" आई आहे तर सर्व जग आहे" "स्वामी तिनी जगाचा आईविना भिकारी ".
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती