वांग्याचे काप

ND
साहित्य : मोठी वांगी, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, हिंग, तेल

कृती - प्रथम धारदार चाकूने वांग्याचे गोल गोल जाडे काप कापावेत. त्या कापांना चवीप्रमाणे तिखट व मीठ लावून थोडा वेळ ठेवावेत. नंतर तांदळाच्या पिठात चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग व जिऱ्याची पूड मिसळून पीठ सारखे करावे. त्या पिठावर वांग्याचे काप दोन्ही बाजूने दाबून घ्यावेत.

नंतर जाड तव्यावर किंवा निर्लेप तव्यावर 1 चमचा तेल टाकून काप दोन्ही बाजूने तांबूस होईपर्यंत ठेवावेत. दुसरे काप ठेवताना तव्यावर पुन: तेल घालावे. अशाप्रकारे सर्व काप करावेत. हे काप गरम असतानाच खावयास चांगले लागतात. विशेषत: खिचडीबरोबर खाण्यास चवदार लागतात.

वेबदुनिया वर वाचा