चायनीज व्हेज फिंगर्स

गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (14:02 IST)
साहित्य : उकडून स्मॅश केलेले बटाटे, दोन टेबलस्पून चिरलेला कोबी, दोन मोठे तमचे बारीक चिरलेला कांदा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेलं गाजर, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, दोन मोठे चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा सोया सॉस, एक लहान चमचा व्हिनेगर, चिमुटभर अजीनोमोटो, ड्राय ब्रेड क्रम्स, दोन ते तीन चमचे मक्याचं पीठ. 
 
कृती : सर्वप्रथम कढईत तेल घेऊन चांगलं गरम होऊ द्यावं. गरम तेलामध्ये आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोबी, गाजर, ढोबळी मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये सोया सॉस, अजिनोमोटो आणि मीठ मिसळावं. हे मिश्रण जास्त शिजवू नये. थोडं क्रंची ठेवावं. तयार झाल्यावर मिश्रण मोठ्या बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात ड्राय ब्रेड क्रम्स मिसळावेत. हाताने वळून मिश्रणाला फिंगर्सचा लंबगोलाकार आकार द्यावा. नंतर ते मक्याच्या पीठामध्ये घोळून घ्यावे. दुसर्‍या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावं. तेल तापल्यानंतर यात फिंगर्स सोडून लाल रंगावर तळून घ्यावे. कुरकुरीत चायनीज व्हेज फिंगर्स तयार आहेत. टोमॅटो सॉस अथवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती