Pita Bread Recipeओव्हनशिवाय पिटा ब्रेड कसा बनवायचा ते जाणून घ्या

रविवार, 21 ऑगस्ट 2022 (15:12 IST)
पिटा हा फ्लॅटब्रेडचा एक प्रकार आहे. जसं भारतीयांसाठी नान आहे तसंच पिटा ब्रेड अरबी लोकांसाठी आहे. या पिटा ब्रेडला अरबी ब्रेड, सीरियन ब्रेड किंवा ग्रीक पिटा ब्रेड असेही म्हटले जाते. जरी त्याचे पीठ नान किंवा पिझ्झाच्या पीठासारखे असले तरी, त्याच्या तयारीमध्ये काही घटक आणि तंत्रे वापरली जातात, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे बनते.आपण घरीच ओव्हन शिवाय पिटा ब्रेड बनवू शकता.चला तर साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
पिटा ब्रेडसाठी लागणारे साहित्य-
 2 कप मैदा
 1 टीस्पून कोरडे यीस्ट
 1/4 टीस्पून मीठ
1/2 टीस्पून साखर
 3/4 कप गरम पाणी
 
पिटा ब्रेड कृती -
सर्व प्रथम, थोडे गरम पाणी घ्या आणि त्यात यीस्ट आणि साखर घाला. आता ते झाकून ठेवा आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा.आता पिठात मीठ घाला. तसेच त्यात यीस्ट आणि पाणी यांचे मिश्रण घाला. सुमारे 10 मिनिटे किंवा मऊ होईपर्यंत मळून घ्या. 
आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला. पण लक्षात ठेवा की हे पीठ गुळगुळीत आणि लवचिक असावे .आता पीठ एक ते दीड तास खमीर येई पर्यंत झाकून ठेवा. पिठाचे सहा समान आकाराचे गोळे बनवा.आता आपण प्रथम पृष्ठभागला डस्टिंग करा. 
आता प्रत्येक गोळ्याला 5-6 इंच गोलाकार लाटून घ्या
लाटलेले पीठ पार्चमेंट कागदावर ठेवा आणि 20 मिनिटे कापडाने झाकून ठेवा.  
आता एक नॉनस्टिक फ्लॅट पॅन घ्या आणि मध्यम आचेवर ठेवा. 
 रोल केलेली पोळी तव्यावर ठेवा आणि सुमारे 9-10 सेकंदात उलटा.
स्पॅटुला वापरून, पिटा ब्रेडच्या कडा हळूवारपणे दाबा, यामुळे ब्रेड फुगण्यास  मदत होईल.जेव्हा ब्रेड पूर्णपणे फुगलेला आणि तपकिरी होईल तेव्हा तुमचा पिटा ब्रेड तयार आहे. ब्रेड मऊ ठेवण्यासाठी कापडाने झाकून ठेवा.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती