नाश्तामध्ये बनवा वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे

शनिवार, 6 एप्रिल 2024 (13:30 IST)
काही ठिकाणी धिरडे हे आंबोई या नावाने देखील ओळखले जातात. नाश्तामध्ये बेसनाचे धिरडे हा प्रत्येक गृहिणीचा पहिला पर्याय असतो. बेसनाचे धिरडे हे चविष्ट असतात तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असतात. या धिरड्यांमध्ये अनेक गृहिणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून याची चव वाढवतात. 
 
नेहमी बेसनाचे धिरडे खाऊन अनेक लोक कंटाळून जातात. म्हणूनच आम्ही तुम्हाला बेसनाच्या धिरड्यांव्यतिरिक्त काही वेगळ्या प्रकारचे धिरडे कसे बनवावे ते सांगणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे खातांना कंटाळ देखील येणार नाही तसेच चावीमध्ये देखील बदल होईल. 
 
रवा धिरडे 
बेसनाचे धिरडे कुरकुरीत बनत नाही याकरिता तुम्ही बेसनमध्ये थोडासा रवा नक्कीच टाकू शकतात. बेसनात थोडासा रवा घातल्यास धिरडे कुरकुरीत होतील व चविष्ट देखील होतील. 
 
मुगाच्या डाळीचे धिरडे
मुगाच्या डाळीचे धिरडे हे बेसनाच्या धिरड्यांपेक्षा खूप आरोग्यदायी असतात. या करीत मुगाची डाळ भिजवून मग तिला बारीक करून घ्यावे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार आले, लसूण, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर देखील घालू शकतात. तयार झालेले मुगाच्या डाळीचे धिरडे तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकतात. 
 
बटाटा धिरडे 
उकडलेले बटाटे किसून त्याचे धिरडे बनवू शकतात. जर तुम्हाला काही चविष्ट खायचे असेल तर बटाट्याचे धिरडे हा एक चांगला पर्याय आहे. 
 
पालकाचे धिरडे 
जर तुम्हाला बेसनाचे धिरडे आवडत असतील पण तुम्हाला त्याची चव बदलायची असेल तर त्यामध्ये पालकाला बारीक वाटून बेसनमध्ये घालावे यामुळे धिरडे कुरकुरीत आणि चविष्ट बनतील. 
 
बाजरीच्या पिठाचे धिरडे
बेसनाच्या जागी तुम्ही बाजरीच्या पिठाचे धिरडे बनवू शकतात. बाजरीच्या पिठाचे धिरडे हे खूप पौष्टिक असतात. यामध्ये आवडीनुसार मसाले टाकून याची चव वाढवू शकतात. 
 
ओट्सचे धिरडे 
ओट्सला बारीक करून घ्या. व यामध्ये आवडीप्रमाणे कोथिंबीर किंवा मसाले टाकून याचे धिरडे बनवू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती