फक्त दोन गोष्टीनी घरात चविष्ट पनीर बनवा

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:41 IST)
पौष्टिक पनीर चे खूप आरोग्यसाठी बरेच फायदे असतात. हे केल्शियम ने समृद्ध आहे. म्हणून हे हाडांना आणि दातांना बळकट करतात. या मध्ये प्रथिने असतात. वजन कमी करण्यासाठी किंवा पनीर बनविण्यासाठी नेहमी लो फॅट च्या दुधाचे वापर करा. प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि पचन शक्ती चांगली करण्यासाठी मॅग्नेशियम देखील असते. बाजारपेठेत मिळणाऱ्या पनीर मध्ये केमिकल चा वापर केला जातो. या साठी घरात पनीर बनवा. चला तर साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
2 लिटर दूध, 4 मोठे चमचे लिंबाचा रस -
  
कृती -
 
सर्वप्रथम दूध उकळवून या मध्ये लिंबाचा रस घाला. दूध फाटल्यावर त्याला मलमली कापड्याने गाळून घ्या. आणि हे दही एकत्र करा. लिंबाची चव घालविण्यासाठी या वर थंड पाणी घाला. मलमली कपड्याला घट्ट पिळून घ्या. पनीर अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवा. नंतर हे काढून ह्याचे चौरस तुकडे करा. घरात बनलेले पनीर तयार.
 
टिप्स: पनीर क्रिमी आणि मऊ बनविण्यासाठी दुधासह ताजे क्रीम देखील घालू शकता. वजन कमी करण्यासाठी लो फॅट दुधाचा वापर करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती