घरी अचानक पाहुणे आले तर लगेचच बनवा झटपट बटाटा वेफर्स

सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (14:27 IST)
अनेक वेळेस घरी अचानक पाहुणे येतात आता अश्यावेळेस पटकन काय बनावावे हे सूचत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत. झटपट बनणारे बटाटा वेफर्स. जे चवीला तर अप्रतिम लागतात पण बनतात देखील पटकन. तर चला जाणून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
4 मध्यम आकाराचे बटाटे
चवीनुसार मीठ 
तळण्यासाठी तेल 
काळे मिरे पूड 
तिखट 
चाट मसाला 
 
कृती-
बटाटे धुवून घ्या. मग त्यांना बारीक स्लाइस मध्ये कापावे. तसेच या स्लाइस दहा मिनिट थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवा. आता या स्लाइस पाण्यातून बाहेरून काढून कागद किंवा कपड्यावर पसरवून ठेवा. 
 
तसेच आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे. आता तेलामध्ये या स्लाइस टाकाव्या व कुरकुरीत तळून घ्या. तसेच तेलातून बाहेर काढल्यानंतर नंतर या स्लाइस कागदावर टाकाव्या. 
 
नंतर या तळलेल्या स्लाइसवर मसाले टाकावे. मीठ घालावे. तर चला तयार आहे आपले कुरकुरीत बटाटा वेफर्स. आलेल्या पाहुण्यांना चहा सोबत सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती