आरोग्यवर्धक मेथीदाणे आणि सुंठाचे लाडू रेसिपी

मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
3/4 कप मेथी दाणे(दुधात भिजवलेले)
500 ग्रॅम-  गूळ 
1कप- बेसन
1कप- गव्हाचे पीठ 
1कप- शुद्ध तूप 
अर्धा कप - डिंक 
2 चमचे- सुंठ 
अर्धा कप - काजू  
अर्धा कप - आक्रोट 
अर्धा कप - बदाम 
वेलची पूड  
 
कृती-
मेथीचे दाणे स्वच्छ धुवून घ्यावे. आता मेथी दाणे 2 कप दुधामध्ये भिजत घालावे.आता एका कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये बदाम घालून भाजून घ्यावे. त्यानंतर काजू देखील भाजून घ्यावे. यानंतर अक्रोट भाजून घ्यावे. तसेच आता डिंक देखील बघून घ्या. डिंक व्यवस्थित भाजून घ्या जेणेकरून ते चिकटणार नाही. 
 
आता तुपामध्ये मेथीदाणे घालावे. व ते देखील भाजून घ्यावे. मेथी दाणे हे तूप सोडायला लागलेकी, समजावे ते भाजले गेले. आता सुंठ पावडर टाकून मेथीदाणे भाजून घ्यावे. 
 
तसेच मेथीदाणे भाजले गेल्यानंतर ते काढून त्याच कढईमध्ये बेसन आणि कणिक भाजून घ्यावी, यामध्ये तूप घालावे. व सोनेरी कलर येईसपर्यंत भाजून घ्यावे. 
 
तसेच आता कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये गुल घालून परतवून घ्या. गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये पाणी घालावे. आता ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक काढून घ्यावे. आता डिंक थोडेसे जाड बारीक करावे. 
 
गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये सर्व मिश्रण घालावे. व थंड झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्रित करावे व त्याचे लाडू वळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले आरोग्यवर्धक मेथीदाणे आणि सुंठ लाडू, जे तुम्ही खाल्ल्यास सर्दी, खोकला यांपासून नक्कीच आराम मिळतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती