दिवाळी रेसिपी : सुरणाची भाजी

शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (12:29 IST)
भारतात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळी पर्वावर अनेक पदार्थ घराघरांमध्ये बनवले जातात. तसेच यापैकी एक पदार्थ म्हणजे सुरणची भाजी. सुरणची भाजी अनेकांच्या घरी दिवाळीमध्ये बनवली जाते. याकरिता आज आपण पाहू या सुरणची भाजी रेसिपी कशी बनवावी. तर चला जाणून घ्या.
 
साहित्य-
सुरण- अर्धा किलो 
कांदा- एक चिरलेला 
टोमॅटो- एक चिरलेला 
बटाटा- एक चिरलेला 
हिरवी मिरची- तीन चिरलेल्या 
आले - किसलेले
हळद- एक चमचा 
धणे पूड- एक चमचा 
जिरे- एक चमचा 
मीठ चवीनुसार 
तेल 
कोथिंबीर 
 
कृती-
सर्वात आधी सुरण स्वच्छ धुवून घ्यावे मग त्याचे साल काढून बारीक तुकडे करून घ्यावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालावे. मग कांदा घालून परतवून घ्यावे. आता आले पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये सुरणचे काप आणि बटाटा घालावा. व मसाले आणि मीठ घालावे. परतवून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेऊन भाजी पंधरा मिनिट पर्यंत शिजू द्यावी. भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे दिवाळी विशेष सुरणची भाजी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती