साहित्य : 1 वाटी लगदा (फणसाला व विळीला तेल लावून फणस कापून घ्या. फोडी मोठ्याही चालतील. चांगल्या धुवून कुकरमध्ये डब्यात पाणी न घालता 3 ते 4 शिट्या होऊ द्या. थंड झाल्यावर लगदा करा.) पाव वाटी किसलेले पनीर, पाव वाटी बटाट्याचा उकडून लगदा, पाव वाटी कॉर्नफ्लावर, थोडं मीठ, थोडी साखर व पाव चमचा मिरेपूड.
ग्रेव्हीसाठी साहित्य : टोमॅटो पांढरट रंगावर घेऊन त्याची प्युरी बनवून घ्या. 10-12 काजू भिजवून, तीळ भिजवून अर्धी वाटी, गरम मसाला दीड चमचा, आले पेस्ट 1 चमचा, लसूण पेस्ट पाव चमचा, पाव वाटी खोवा, थोडे वरून फ्रेश क्रीम.
कोफ्ता : उकडलेल्या फणसाचा गर, पनीर मळलेले व बटाट्याचा लगदा मिसळून घ्या. चवीनुसार मीठ, साखर व थोडी मिरेपूड घाला. कॉर्नफ्लावर पाव वाटी घाला. चांगले कालवून छोटे छोटे गोलाकार कोफ्ते बनवून तेलावर लालसर तळून काढा. कोफ्ते बनवून ठेवा.
ग्रेव्ही - गरम कढईत तेल घालून (भरपूर तेल) जिरे घाला. काजू व तिळाची वाटलेली पेस्ट घाला. परता, आल्याची पेस्ट व लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी घाला. चांगली परता. बाजूंनी तेल सुटेल. थोडा खोवा घाला, परता, गरम मसाला घाला व थोडे दूध मिश्रीत पाणी घाला. मीठ व थोडी साखर घाला. ग्रेव्ही चांगली उकळू द्या. फ्रेश क्रीम घाला, गॅस बंद करा. देताना डिशमध्ये कोफ्ते घालून वरून ग्रेव्ही घाला.