कृती : कॉर्न चे दाणे चांगले दुधात शिजवून घ्यावे, नंतर मिक्सर मधून जाडसर काढून घ्यावे. त्यात मीठ, मिरपूड, कोथिंबीर (बारीक चिरलेली) मिरच्यांचे तुकडे (बारीक-बारीक चिरलेले) घालून चांगलं सूप प्रमाणे घट्ट (दाट) शिजवून घ्यावे. ब्रेडचे स्लाइस चांगले भाजून घ्यावे. त्यावर कॉर्नचे तयार मिश्रण घालावे. वरून थोडे किसलेले चीज घालावे. वरती दुसरी स्लाइस ठेवावी. कॉर्न सॅण्डविज तयार आहे.