वास्तुशास्त्रानुसार सजवा छोट्यांची रूम

आधुनिक जीवनशैलीनुसार हल्ली घर छोटे वा मोठे याला फारसे महत्त्व नसते, तर घरातल्या सुविधा, प्रत्येक सदस्याला मिळणारी स्वतंत्र स्पेस, घराघरात जपला जाणारा जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांची घेण्यात येणारी काळजी, मुख्य सदस्य, वयोवृद्ध मंडळी तसेच लहानग्यांना मिळणारी प्रायव्हसी, सुविधा अशा सर्वच बाबींचा विचार प्रत्येक घरात केला जात आहे.

ही स्वागतार्ह बाबच म्हणावी लागेल. प्रत्येकाची प्रायव्हसी जपताना सर्वात कठीण काम असते ते लहान मुलांची रूम सजवण्याचे. लहानग्यांचे वय, मूड, आवड आदी बाबींचा विचार करून छोट्या मुलांची रूम सजवावी हेच बरे. मुलांच्या रूममध्ये प्रामुख्याने स्टडी टेबल, बैठक व्यवस्था, बेड, पुस्तकांकरिता स्वतंत्र रॅक, सेल्फ, पुरेशी लाईट व्यवस्था तसेच हवेशीरपणा, पिण्याचे पाणी व टॉयलेट, बाथरूमची नजीकता, प्रथमोपचार बॉक्स आदी गोष्टी महत्त्वाच्या राहतात. मुलांच्या बेडजवळून जिना काढू नका वा जिन्याखाली मुलांच्या बेडरुम येणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांच्या रुमला साधे लॉकींग ठेवा बर्‍याचदा लॅच सिस्टीमुळे मुले अडकण्याची भीती सर्वाधिक राहते.

मुलांच्या रुमची रंगसगती फार गडद नको. शक्यतो मुलांच्या आवडीचे खेळाडू, काटरुन्स, फुलपाखरे, फुले, नैसर्गिक चित्र, वारली पेटींग, रुफ डिझाईन्स, आकाशगंगा आदींच्या मदतीने भिंती, छताची रंगरंगोटी करता येते. मुलांच्या रुममध्ये ओले कपडे, आंघोळीचा टॉवेल कधीही वाळत टाकू नका, यामुळे हवेत आद्र्रता राहते, अनेकदा मुलांना सर्दीचा त्रास उदभवू शकतो. रुममध्ये सुविधांच्या नावाखाली चारही भिीतीलगत फर्निचरची गर्दी करु नका. आपल्या मुलांना त्यांची स्वत:ची खोली सजविणे, आवरणे, स्वच्छ ठेवणे आदीं गोष्टींबाबत स्वावलंबी कराच त्यांना त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्याकरीता स्वतंत्र रुम महत्वाची भुमिका बजावते हे लक्षात घ्या.

वेबदुनिया वर वाचा