आकारमान आणि प्रमाण वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे अंग आहे. याद्वारे (हस्त-लक्षण) कोणतीही वास्तू बांधण्यापूर्वी दिशा ठरवल्यावर वास्तुविन्यास केला जातो. जमिनीचा आकार, लांबी, रुंदी या आधारे वास्तुपदविन्यासापासून संपूर्ण बांधणी एका निश्चित प्रमाणाच्या आधारे केली जाते. पहिल्यांदा मालकाच्या हाताच्या (बोटांच्या) आधारे हे केले जात असे. हल्ली त्याला cm, m, feet या मोजमापाच्या आधारे केले जाते.
समरांगण सुत्रधारानुसार मोजमापाशिवाय कोणत्याही गोष्टीला मूर्तरूप देता येणे अशक्य आहे.निराकार ब्रम्हाला सगुणरूप देण्यासाठी मायेची गरज आहेच. मायाच या जगाची मूळशक्ती आहे. आपल्या परंपरेत कलाकृतीची रमणीयता त्याबरोबरच शास्त्रशुद्धताही आहे.
ज्याप्रमाणे वस्तुपासूनच वास्तू बनते. त्याचप्रमाणे कोणत्याही पदार्थापासूनच वस्तू बनवण्यासाठी मान (प्रमाण) आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात मान-प्रमाण (मोज-माप) खालील प्रकारे आहेत.
1. मान 2. प्रमाण 3. आदिमान 4. लम्बमान 5. उनमान 6. उपमान
आयादी निर्णय :- उत्पन्न-खर्च (आवक-जावक- विचार वास्तुशास्त्रातही महत्वाचा आहे. हा पूर्ण ज्योतिषावर आधारीत भाग आहे. ज्यात घराची शुभाशुभता (मालकाच्या संदर्भात) पाहिली जाते, घराचे, मुख्य घराचे माप-परिमाण (लांबी रूंदी), ज्योतिषाची नक्षत्रे, वास्तुतिथी, योग या आधारे आयादी निर्णय घेतात.
वास्तुपुरुषाच्या दिशेच्या आधारे आठ योनी ध्वज, धूम, सिंह, श्वान, वृष, घर, गज, श्वाक्ष आहेत या शिवाय आय विचार, व्ययविचार, योनी विचार, नक्षत्र विचार हे सर्व गणिताच्या आधारे काढले जातात.
आय विचार:-
जमिनीची लांबी, रुंदीला मालकाच्या हाताने मोजावी व जे क्षेत्रफळ येईल त्याला आठने भागावे. बाकीवरून खालील परिणाम होतात.
आय कोष्टक
आय
दिशा
परिणाम
ध्वज
पूर्व
अर्थ
धूम
आग्नेय
लाभ
सिंह
दक्षिण
लाभ
श्वान
नैत्रहत्य
भोग
वृष
पश्चिम
अशुभ
खर
वायव्य
धन-धान
गज
उत्तर
त्रिदुषण
ध्वाक्ष
इशान्य
मंगल, मृत्यु
व्यय विचार :- मालकाच्या नक्षत्राला आठने भागून उरलेल्या बाकीला व्यय म्हणतात. आय व्ययपेक्षा कमी असल्यास क्रमश: यश, राक्षस, पिशाच्च निघतात. यात पहिला शुभ, दुसरा साधारण व तिसरा अशुभ परिणाम आहे.
अंश विचार :- घराचे क्षेत्रफळ, नाव, अक्षर, संख्या व व्ययसंख्या मिळवून त्याला 3 ने भाग दिल्यावर जी बाकी राहिल तो अंश. एक राहीला तर इंद्र, दोन राहिला तर यम व तीन राहिले तर राजा.
व्यवसायनुसार शुभ आय
ध्वज
शुद्र
कारखाना, विक्री
सिंह
ब्राह्मण
दुकान, हाँटेल, क्लब, सरकारी कार्यालये, न्यायालय, कारखाना
गज
क्षत्रिय
नाट्यमंदिर, दुकान, गोदाम, वेअर हाउस
वृष
वैश्य
शाळा, काँलेज, थिएटर, धर्मशाळ
नक्षत्र विचार :- घराच्या नक्षत्रापासून मालकाच्या नक्षत्रापर्यंत मोजावे, येणार्या संख्येला नऊने भागून उरणारे नक्षत्र आहे या नक्षत्रात 6,4,9 शुभ आहेत तर 2,18 मध्यम व 5,7 अशुभ आहेत.
राशी विचार :- घराच्या नक्षत्राला 4 ने गुणून आलेल्या गुणाकाराला नऊने भागून येणारी राशी भोगराशी आहे. 2,6,8,12 अशुभ आहेत.
वास्तुशास्त्रात गणित, रसायन, भौतिक, सामुद्रिक, आयर्वेद, ज्योतिष या सगळ्यांचा वापर केला जातो.