पृथ्वीची गरूत्वाकर्षण शक्ती

MH GovtMH GOVT
पृथ्वी एखाद्या चुंबकाप्रमाणे गुणधर्म दाखविते. पृथ्वीचा गुरूत्वीय मध्य हा तिच्या आत केंद्रस्थानी असून तिचे चुंबकीय क्षेत्र दोन ध्रुवांपर्यंत सारखे आहे. पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीचा माणसावर फार मोठा परिणाम होतो. त्यामुळेच वास्तुशास्त्रात चुंबकीय क्षेत्राचा विचार केला जातो. त्यामुळे त्यातील सर्व नियम हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. माणसाचे डोके हे उत्तर ध्रुवाचे काम करते. शास्त्रज्ञ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा विचार करतात.

मात्र, त्यांना त्यापासून उत्पन्न होणारी कोणती ऊर्जा माणसाला कशी फायदेशीर आहे याचे ज्ञान नाही. पण आपल्या ऋषीमुनींनी आपल्या हजारो वर्षांच्या अनुभवाच्या सहाय्याने याचा शोध लावला आहे. म्हणूनच घरबांधण‍ीपूर्वी जमीन त्याची दिशा याचा विचार प्राधान्याने करावा लागतो. कारण जमीन हे एक पृथ्वीचेच रूप आहे. जमिनीचा आकार, प्रकार त्याच्याशी निगडीत दिशा, झाडे, पाणीसाठा या बरोबरच जमिनीची ऊर्जा, गुरूत्वीय तसेच केंद्रीय बल व पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी याही गोष्टींचा परिणाम होतो. म्हणून वास्तुशास्त्रात सांगितले आहे, की झोपताना माणसाचे डोके उत्तरेला असू नये कारण पृथ्वाच्या उत्तर ध्रुवाप्रमाणे माणसाचे डोके हा उत्तर ध्रुव (मानवी शरीराचा) आहे. त्यामुळे समान ध्रुव एकमेकांना प्रतिकर्षित करतात.

'similar poles replac each other' या नात्याने माणसाचा रक्तदाब वाढणे, झोप न लागणे, तणाव या सारखे त्रास संभवतात. वास्तुशास्त्रातले सर्व नियम पृथ्वीची ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र, तिचे तापमान, पृथ्वीवर पडणार्‍या केंद्रीय बलांच्या परिणामावर आधारावर ठरविले आहेत. कारण आत्तापर्यंत तरी घरबांधणी पृथ्वीवरच शक्य झाली आहे. ज्या जमिनीवर घर बांधले जाते त्यावर 35 प्रकारच्या ऊर्जा असतात ज्याला वास्तुपुरूषाचे मंडळ म्हणतात त्यात काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह एनर्जी असतात.

सूर्यापासून ग्रहांची अंतर

बुध -- 57,900,000 कि.मी.
शुक्र -- 108,200,000 कि.मी.
पृथ्वी -- 147,500,000 कि.मी.
मंगळ -- 227,700,000 कि.मी.
गुरू -- 778,300,000 कि.मी.
शनी -- 1427,000,000 कि.मी.
अरूण (युरेनस) -- 2889,600,000 कि.मी.
वरूण (नेपच्यून) -- 4496,600,000 कि.मी.
कुबेर (प्लूटो) -- 5900,000,000 कि.मी.

बुध व शुक्राला उपग्रह नाही. मंगळाला 2, पृथ्वीला 1, गुरूला 13, शनीला 10, युरेनसला 3, व नेपच्युनला 2 उपग्रह (चंद्र) आहेत.

(अनुवाद- सौ. भाग्यश्री कुलकर्णी)

वेबदुनिया वर वाचा