Vastu Tips – ह्या तीन वस्तू दारासमोर ठेवू नये

शनिवार, 25 मार्च 2023 (22:09 IST)
वास्तू टिप्स– ज्या वस्तू भाग्यासाठी बाधक असतात त्यांना घराच्या मुख्य दाराजवळ ठेवण्यापासून बचाव करायला पाहिजे. शास्त्रानुसार देवी देवतांची कृपा हवी असेल तर दाराच्या पवित्रतेचे विशेष लक्ष्य ठेवायला पाहिजे, कारण दारामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा घरात प्रवेश करते.
येथे आम्ही जाणून घेऊ कोणत्या त्या तीन वस्तू आहेत ज्यांच्यामुळे भाग्याचा साथ आम्हाला मिळत नाही.
 
1. काटेरी पौधे
घराच्या मुख्य दारावर काटेरी पौधे नाही ठेवायला पाहिजे. अशा झाडांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. जर हे झाड दारासमोर ठेवले तर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. तसेच, देवी देवतांची कृपा देखील मिळणार नाही. घरात प्रवेश करताना हे काटे आम्हाला बोचू शकतात. यामुळे दाराच्या आजू बाजू काटेरी झाड ठेवू नये.
 
2. तुटका पलंग किंवा खुर्ची  
नेहमी आम्ही बघतो की जेव्हा घरात प्रवेश करतो तर प्रवेश केल्याबरोबरच बसण्यासाठी खुर्ची किंवा पलंग ठेवलेला असतो. पण हे पलंग किंवा खुर्ची जर तुटलेली ठेवली तर त्यावर बसणारा व्यक्ती पडू देखील शकतो. म्हणून दाराच्या आजू बाजू तुटलेल्या वस्तू ठेवू नये. या बाबतीत एक अशी मान्यता देखील आहे की दारासमोर तुटलेला पलंग ठेवला तर घरात अशांतीचे वातावरण निर्मित होते. कुटुंबात विवादाची स्थिती होऊ शकते. तसेच, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही.
 
3. फुटके भांडे  
जास्त करून घरात जेव्हा एखादे भांडे तुटले तर त्यांना आम्ही घरामध्ये ऐका कोपर्‍यात ठेवून देतो. घरात कधीही तुटके भांडे ठेवू नये. लगेच त्यांना घराबाहेर काढावे. मुख्य दारासमोर जर तुटके भांडे ठेवले तर देवी देवता यांना बघून घरात प्रवेश करत नाही. घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. भाग्य संबंधी सर्व अडचणी दूर करण्यासाठी दारासमोर अशा वस्तू ठेवणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती