वास्तूप्रमाणे कुठे असावे वॉश बेसिन?

मंगळवार, 21 मे 2019 (16:41 IST)
वास्तूप्रमाणे प्रत्येक वस्तूसाठी एक जागा शुभ निर्धारित करण्यात आली आहे. घरात वॉश बेसिन असणे अगदी सामान्य आहे. हे बेसिन योग्य ठिकाणी असल्यास घरातील शुभता वाढते.
 
* बाथरूममध्ये लागणारे वॉश बेसिन ज्याच्यासमोर आरसा लागलेला असतो ते उत्तरी किंवा पूर्वी भीतीवर लावावे.
 
* डायनिंग किंवा लिव्हिंग रूममध्ये आरशासह वॉश बेसिन लावायचे असेल तर हे ही उत्तरी किंवा पूर्वी भीतीवर लावावे. आरसा नसलेले वॉश बेसिन दक्षिण किंवा पश्चिम भीतींवर लावू शकता.
 
* डायनिंग, लिव्हिंग किंवा कोणत्याही भागाच्या ईशान, आग्नेय आणि नैतृत्य दिशांमध्ये बेसिन फिट करू नये.
कोणत्याही बेडरूममध्ये वॉश बेसिन लावू नये.
 
* घराच्या मुख्य दराच्या अगदी समोर वॉश बेसिन किंवा टॉयलेटचे दार नसावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती