मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची खोली वस्तूप्रमाणे असायला हवी. वस्तूप्रमाणे बदल केल्याने मुलांची मानसिक वाढ होत असून त्यांची ग्रहण करण्याची क्षमतादेखील वाढते. याने मुलं मन लावून अभ्यास करतात व त्यांचं आरोग्यही उत्तम राहतं.
* घरात मुलांची खोली पूर्व, उत्तर, पश्चिम किंवा वायव्य दिशेत असणे चांगले असते. दक्षिण, नैऋत्य किंवा आग्नेय मध्ये मुलांची खोली नसावी.
* मुलांच्या खोलीतील रंग पूर्णपणे त्यांच्या शुभ रंगाप्रमाणे असायला हवा. मुलांच्या पत्रिकेप्रमाणे हे निश्चित करायला हवं.
* परद्याचा रंग भिंतीच्या रंगापेक्षा गडद असायला हवा.
* मुलांचा पलंग उंच नसला पाहिजे. आणि झोपताना त्यांचे डोके पूर्व दिशेकडे आणि पाय पश्चिमीकडे असावेत.
* पलंगाच्या उत्तर दिशेकडे टेबल-खुर्ची असावी.
* अभ्यास करताना मुलांचे तोंड पूर्वीकडे आणि पाठ पश्चिमीकडे असली पाहिजे.
* पलंगाच्या दक्षिण दिशेकडे आग्नेय कोणात कम्प्यूटर ठेवले पाहिजे.
* खोलीचे दार पूर्वीकडे असल्यास पलंग उत्तर-दक्षिण या दिशेत ठेवायला पाहिजे. आणि डोकं दक्षिणेकडे तर पाय उत्तरकडे असले पाहिजे. अशात कम्प्यूटर टेबलाजवळच स्टडी टेबल असावं.
* नैऋत्य कोणात मुलांच्या पुस्तकांची व कपड्यांची अलमारी ठेवली पाहिजे.
* मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश पर्याप्त येत असल्याची काळची घ्यावी.
* मुलांच्या खोलीत हिंसक किंवा बटबटीत चित्र लावू नये.
* मुलांच्या खोलीत नैसर्गिक सौंदर्य, पाळतू जनावर किंवा महापुरुषांचे चित्र लावले पाहिजे.
* मुलं लहान असल्यास कार्टून आणि मोठा असल्यास त्याला ज्यात करिअर करायचे आहेत त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तींचे चित्र लावणे उत्तम.
* मुलांच्या खोलीतली कोणतीही खिडकी घराच्या इतर खोलीच्या बाजूला उघडणारी नको. याने ते घरातल्या हालचालीने डिस्टर्ब होतात.