येथे ठेवा पाणी, नांदेल सुख-समृद्धी

पाण्याचे भांडे स्वयंपाकघराच्या उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेकडे भरून ठेवावे. घरात पाणी योग्य ठिकाणी ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहतं आणि सुख-समृद्धी नांदते.
 
पाण्याचे स्थान ईशान कोण आहे म्हणून पाण्याचे स्टोरेज‍, टाकी किंवा बोरिंग पूर्व, उत्तर किंवा पूर्वोत्तर दिशेत असावं. पाण्यातील पंपदेखील याच दिशेला असावा.
 
दक्षिण-पूर्व, उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण- पश्चिम कोण या दिशेला विहीर किंवा ट्यूबवेल नसावी. यासाठी उत्तर-पूर्व कोण योग्य आहे.
 
इतर दिशेला विहीर किंवा ट्यूबवेल असल्यास ती भरवावी. भरवणे शक्य नसल्यास वापरणे टाळावे.
स्नानगृह पूर्व दिशेकडे असावं.
 
घरातील कोणत्याही नळातून पाणी गळणे योग्य नाही. याने दारिद्र्य येतं.
 
ओव्हर हेड टँक उत्तर किंवा वायव्य कोण यांच्या मधे असावं. टँकच्या वरील भागाचा आकार गोल असावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती