वास्तु प्रमाणे घरात लावा ही झाडं

वास्तु शास्‍त्राप्रमाणे घरात सजावटीसाठी ठेवण्यात येणार्‍या झाडांचा आमच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. नकळत आम्ही असे काही झाडं घरात लावतो ज्यामुळे वास्तु दोष उत्पन्न होतो. पाहू या घरात कोणती झाडं लावायला हवी आणि कोणती नाही...

* घरात मनीप्लांट लावणं शुभ असतं. मनीप्लांट शुक्र ग्रहाचा घटक असून या झाडामुळे पती-पत्नीचे संबंध मधुर राहतात.

* घरात काटेरी किंवा असे झाडं लावू नये ज्यातून दुधासारखं पांढरा द्रव बाहेर येतं. काटे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. गुलाबासारखी काटेरी झाडं लावायला हरकत नाही तरही त्यांना घराच्या गच्चीवर ठेवणे उत्तम.

* बांबूचे झाड शुभ मानले जातात. फेंगशुई प्रमाणे बांबूचे झाड सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
दुकानात किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी फुलदाणीत दररोज ताजी फुलं ठेवायला हवी. वाळलेली फुलं नकारात्मकता पसरवतात.


* डाइनिंग रूम किंवा ड्रॉइंग रूममध्ये कुंडे ठेवायला हरकत नाही पण बेडरूममध्ये कोणत्याही प्रकाराची झाडे लावू नये. याने वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो.

* कधीही बॉन्साय झाडं लावू नये. वास्तुशास्त्राप्रमाणे बॉन्साय झाडांमुळे घरातील लोकांचा आर्थिक विकासावर थांबतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती