वास्तूप्रमाणे त्रिकोणी प्लॉट शुभ की अशुभ ?

शुक्रवार, 24 मार्च 2023 (23:14 IST)
आकाराप्रमाणं सुमारे ४0 प्रकारचे प्लॉट वास्तुशास्त्रानं सांगितलेत. जसे छिन्नकर्ण, विकर्ण, दर्पण, शम्बुक, कुर्मपृष्ठ, गजदंताकार, डमरू, ढोलकी, शय्याकार, लंबवतरुळ वगैरे.. आणि त्यांचे भिन्न वापरही सांगितलेत. याला 'वास्तु संस्थान मातृका' असं म्हणतात. प्लॉट चौरस किंवा आयताकृती नसेल तर तो टाकून द्यावा, असं काही नाही. त्याचा सर्वसामान्यांच्या निवासाशिवाय अन्य कारणांसाठी वापर करता येऊ शकतो.
 
त्रिकोणी आकाराच्या प्लॉटमध्ये गणिकांची घरं बांधावीत, असं वास्तुशास्त्र म्हणतं. मात्र सर्वसामान्यांना निवासासाठी हा प्लॉट चांगला नाही. असा प्लॉट असेल तर तेथे हॉटेल बांधावं. या हॉटेलात कॅसिनो, पब, बीअर बार असले उद्योग करावेत. तुफान चालतात. आगीपासून व भाऊबंदकीपासून मात्र कायम सावध राहावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती