पोळपाट-लाटणे श्रीमंत बनवू शकतं, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा

Polpat Latne Vastu स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणारी सर्वात महत्तवाची वस्तू पोळपाट लाटणे देखील तुम्हाला आनंदी आणि श्रीमंत बनवू शकते असे म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. पण होय! वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात पोळपाट लाटणं याचा योग्य वापर केल्यास घरातील समृद्धी वाढते. दुसरीकडे काही महिला या वस्तूंबद्दल काही अशा चुका करतात, ज्यामुळे घरात अशांतता आणि पैशाची हानी वाढू लागते. पोळपाट लाटणे याचा योग्य वापर आणि त्याबाबत कोणत्या चुका करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे-
 
वास्तु शास्त्राप्रमाणे जेव्हा पोळी बनवताना पोळपाट आवाज करत असेल तर वास्तु दोष उत्पन्न होतं. असे मानले जाते की पोळपाटाच्या आवाजामुळे घरातील धनाची हानी होते. त्यामुळे जर तुमच्याही पोळपाटातून आवाज येत असेल तर ते लगेच बदला आणि दुसरे नवीन वापरण्यास घ्या. असे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पोळपाटाखाली कापड किंवा कागदही ठेवू शकता. यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो.
 
वास्‍तुप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणे स्वच्छ धुवुन ठेवावे. तसं तर पोळ्या झाल्याबरोबरच हे धुतले गेले पाहिजे. असे न केल्यास घरातील लोकांच्या आरोग्यावर प्रभाव पडतो आणि अधिकाधिक धन आजारावर खर्च होतं. सोबतच याने वास्तुदोष उत्पन्न होतं.
 
अनेक घरांमध्ये स्त्रिया असे पोळपाट वापरतात, ज्याचे पाय तुटलेले असतात किंवा फक्त दोन पाय असतात. परंतु असे पोळपाट वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. जर तुमच्या घरात असे पोळपाट असेल तर ते लवकर बदला.
 
वास्तु शास्त्राप्रमाणे पोळपाट कधीही उलटून ठेवू नये नाहीतर घरात वास्तु दोष वाढतो. या व्यतिरिक्त पोळपाट कधीही भांड्यांमध्ये किंवा कणिक-तांदळाच्या डब्यावर ठेवू नये. याने धन हानी होते. अशाने घरात मतभेद देखील वाढतात. तर काही लोक पोळ्या बनवल्यानंतर याला धान्य किंवा कणकेच्या डब्यावर ठेवून देतात. परंतु जाणून घ्या की असे केल्याने जीवनात दारिद्रय येतं. म्हणून चुकून असे करणे टाळावे.
 
तसेच अनेकांना हे माहित नसेल की पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी देखील शुभ मुहूर्त बघितला जातो. होय, पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी बुधवार हा दिवस सर्वात शुभ असल्याचे मानले जाते. तर मंगळवार आणि शनिवार या दिवशी चुकुनही पोळपाट लाटणे खरेदी करु नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती