जर घरामध्ये खूप प्रयत्न करूनही पैसा टिकत नसतील किंवा यश मिळत नाही. घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत सतत खराब असते किंवा एकामागून एक समस्या येत असतात. अशा परिस्थितींमागे वास्तू दोष कारणीभूत असू शकतात. वास्तूनुसार प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते आणि त्याचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. जर नकारात्मक ऊर्जा असलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतील तर जीवनात अडचणी येतात. त्यामुळे घर-दुकान किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यापूर्वी वास्तु तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो.
या गोष्टी आर्थिक संकटात आणतात
अशा काही नकारात्मक गोष्टी आर्थिक संकटाला कारणीभूत ठरतात. या गोष्टींचा प्रभाव इतका मोठा आहे की त्या घराभोवती असल्यानेही मोठ्या अडचणी निर्माण होतात.
झाडाची सावली : घराभोवती फार मोठे आणि घनदाट झाड असणे चांगले मानले जात नाही. घरावर झाडाची सावली पडल्यास ते वास्तुदोषाच्या श्रेणीत येते. यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. तसेच झाडामुळे घरात येणारी ताजी हवा आणि सूर्यप्रकाश थांबल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घराभोवती अशी झाडे लावावीत, जी फार उंच नसतील.