रात्री झोपतांना या वस्तू डोक्याजवळ ठेऊ नका

शनिवार, 20 एप्रिल 2024 (07:00 IST)
आधुनिक यंत्र आपल्या शांतीला भंग करू शकतात. झोपतांना रात्री आपल्या डोक्याजवळ पर्स किंवा व्हॉयलेट ठेऊन झोपू नये. वास्तुअनुसार दोरी, साखळदंड, डोक्याजवळ असल्यास कार्यांमध्ये अडचण निर्माण होते. तसेच वास्तुशास्त्रानुसार मनुष्याने झोपतांना उशीखाली पेपर ठेऊन झोपू नये. 
 
तुम्ही देखील रात्री झोपताना यापैकी काही वस्तू डोक्याजवळ ठेऊन झोपत असाल तर, जीवनात नाकारात्मकता आणि अशुभता वाढते. चला जाणून घेऊ या कोणत्या आहे त्या वस्तू ज्या रात्री उशीजवळ ठेवल्यास नकारात्मकता वाढवू शकतात. 
 
आधुनिक यंत्र  
यंत्राला नेहमी स्वचालित मानले गेले आहे, हे नेहमी चालत राहतात. हे आपल्या शांतीला अवरुद्ध करू शकतात. घड्याळ, मोबाइल, फोन, लॅपटॉप, टीवी, वीडियो गेम, यांसारखे अनेक यंत्र डोक्याजवळ घेऊन झोपण्याचा सल्ला कोणीही वस्तूतज्ज्ञ आणि ज्योतिष देत नाही. यांमधून निघणारी किरणे आरोग्य आणि मानसिकदृष्ट्या घातक असतात. 
 
पर्स, वॉलेट  
कधीही आपल्या डोक्याजवळ पर्स किंवा व्हॉयलेट घेऊन झोपू नये. हे तुमच्या खर्चाला वाढवू शकतात. कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा वास नेहमी तिजोरीमध्ये असतो. झोपण्यापूर्वी आपली पर्स योग्य ठिकाणी ठेवावी.  
 
दोरी, साखळदंड 
दोरी कधीही उशीजवळ ठेऊ नये. वास्तु अनुसार, दोरी आणि साखळदंड इत्यादी अशुभ प्रभाव पडतात. यामुळे मनुष्याच्या कार्यात नेहमी बाधा येते. व काम बिघडते. 
 
मुसळी 
वास्तुशात्रानुसार आपण जिथे झोपतो तिथे उशीजवळ किंवा अंथरुणजवळ मुसळी ठेऊ नये. यामुळे नात्यांमध्ये दुरावा येतो. व्यक्ती नकारात्मक गोष्टींकडे झुकतो. 
 
पेपर किंवा चुंबक 
वास्तुशास्त्र अनुसार मनुष्याने आपल्या उशीखाली पेपर आणि चुंबक यांसारख्या वस्तू ठेऊन झोपू नये. या गोष्टींना ठेऊन झोपल्याने मनुष्याचे आयुष्य प्रभावित होते. तसेच जीवनात नाकारत्मकता आणि अशुभता वाढते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती