व्हॅलेंटाइन डे ने उद्योग जगताला नवसंजीवनी दिली आहे. या दिवशी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी देण्यात येणार्या विविध भेटवस्तूंची बाजारात विक्री वाढली आहे.
या माध्यमातून, चालूवर्षी उद्योग जगताला तीन हजार करोड रुपयांची कमाई मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ही रक्कम गेल्या दोन वर्षात झालेल्या फायद्याच्या दुपटीहून अधिक आहे.
आज (गुरुवार) साजरा होत असलेल्या या दिवसासाठी गेल्या महिनाभरापासून बाजार सजले आहेत. यातूनच आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यात येणार्या वस्तूंमध्येही आधुनिकतेने शिरकाव केला असल्याने अधिक मौल्यवान वस्तू भेट स्वरूपात देण्याचा नवा पायंडा पडला आहे. आणि याचाच फायदा उद्योग जगताला झाला आहे.