टीचर्स डे 2019 : हे 5 गुण प्रत्येक शिक्षकात असावे

ज्ञान असो वा योग्यता किंवा आदर्श व्यक्तिमत्त्व, या सर्वात शिक्षक आमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतात. ज्ञान व्यतिरिक्त इतर योग्यता देखील एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवडतं बनवतं. जाणून घ्या 5 गुण जे शिक्षकाला परिपूर्ण बनवतात.
 
1 नॉलेज- एक शिक्षक होण्याच्या नात्याने विषयासंबंधी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त समकालीन विषयांचे ज्ञान व स्वतःचा विषयावर होत असलेले अद्यतन माहीत असावे. ज्यानेकरुन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन समाधान करता येऊ शकतं.
 
2 प्रेझेंटेशन- शिक्षक म्हणून ज्ञान असणे जितके गरजेचे आहे तेवढेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक पातळी वेगळी असल्याने प्रेझेंटेशन असे असावे ज्याने प्रत्येकाला सोप्यारीत्या समजता येईल.
 
3 फ्रेंडली नेचर- शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात अनुशासन आवश्यक आहे परंतू त्यांच्यासोबत धाका ऐवजी मैत्रीचा व्यवहार अधिक योग्य ठरतो. याने शिक्षक विद्यार्थ्याला समजून त्याला योग्य पद्धतीने शिक्षण देऊ शकतात. याने अंतर्मुखी विद्यार्थ्याची भीती दूर होईल आणि तो मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकेल.
 
4 अनुभव आणि उदाहरण- केवळ विषयासंबंधी माहिती नव्हे तर‍ शिक्षकांचे अनुभव देखील विद्यार्थ्यांना कामास येतात. याने विद्यार्थ्यांसोबत उत्तम समन्वय राहील. गोष्टी उदाहरण देऊन समजवल्यास मुलांना पटकन समजतात आणि नेहमीसाठी लक्षात राहतात.
 
5 जीवनाची समज- एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनात योग्य वाईटाची ओळख, उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक गोष्टी, व्यवहार आणि मानवतेचे शिक्षण प्रदान करतं. कारण या जीवनाच्या मूलभूत गरजा आहे. अभ्यासात हुशार नसणार्‍यांना मुलांना निराश न करता जीवनात ते इतर काय योग्य रित्या पार पाडू शकतात त्याबद्दल उद्देश करू शकता. जीवन केवळ उच्च शिक्षणापर्यंत मर्यादित नाही तर त्याहून खूप काही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती