वसंत पंचमीच्या दिवशी का बनवतात केशरी भात? जाणून घ्या केशर भात रेसिपी

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (13:00 IST)
वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान केले जाते व घरात पिवळे रंगाचे जेवण बनवले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी केशरी भात म्हणजे गोड भात यासाठी केशरचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहित आहे का वसंत पंचमीच्या दिवशी केशर भात का बनवाला जातो? चला जाणून घेऊ या गोड भाताची रेसिपी. 

साहित्य- 
1 कप तांदूळ 
3 ते 4 चमचे तूप 
चवीनुसार साखर 
5 कप पाणी 
केशर 
लवंग 
काजू, बादाम 
तेजपान 
हिरवी वेलची 
 
कृती 
केशरी भात बनवण्यासाठी सर्वात आधी एका वाटीत केशर भिजवून ठेवा. यानंतर तांदूळ साफ करून 30 मिनिटसाठी पाण्यात भिजवून ठेवा. एका पॅन मध्ये तूप टाकून त्यात तेजपान, वेलची, काजू आणि बादाम, टाकून चांगले भाजून घ्या. नंतर यात तांदूळ टाकणे. 2 मिनिट तांदूळ भाजून घ्यावे. तांदूळ मध्ये पाणी टाकून शिजु द्यावे. तांदूळ शिजल्यानंतर ते गाळून घ्यावे. मग परत एका पॅन मध्ये तूप टाकून त्यात साखर टाकून पाक तयार करणे. या पाकात शिजलेला भात आणि केशरचे पाणी टाकावे व मिक्स करावे जोपर्यंत सर्व पाणी आटत नाही तोपर्यंत फ़्राय करावे. काजू, बादाम टाकून भात गार्निश करावा. तुमचा केशर भात बनून तयार आहे. लक्षात ठेवाल की गोड भात बनवण्यासाठी केशरचाच उपयोग करणे.
 
वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे, पिवळे अन्न शिजवणे शुभ मानले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. हिंदू धर्म अनुसार माता सरस्वतीला केशरी भात खूप प्रिय आहे. म्हणून माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी केशरी भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती