Christmas 2023 Cake Recipe10 प्रकारच्या डिलीशियस केक

ख्रिसमसवर अनेक प्रकारच्या केक तयार करण्यात येतात. आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही खास प्रकारच्या लाजवाब आणि डिलीशियस केक, ज्या तुमच्या फेस्टिवलचा उत्साह अधिकच वाढवण्यास मदत करेल.  
 
1. ब्लॅक फॉरेस्ट केक
साहित्य : 80 ग्रॅम मैदा, 100 मिली दूध किंवा पाणी, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 50 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 20 ग्रॅम कोको पावडर.
 
फिलिंग साठी : 400 ग्रॅम ताजे क्रीम, 500 ग्रॅम आयसिंग शुगर, 100 ग्रॅम चेरी, 50 ग्रॅम चॉकलेट आणि 6 चेर्‍या सजावटी साठी व 2 चमचे चेरी सिरप.
 
कृती : बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे. केकपात्राला तुपाचा हात लावून चारी कडे मैदा पसरवून त्यात मिश्रण ओतावे. 190 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. ताजी क्रीम एका भांड्यात घ्यावी त्यात साखर व इसेंस घालून 3 ते 4 तासांसाठी थंड करायला ठेवावी. नंतर त्याला चांगले फेटून घ्यावे. केक चे दोन भाग करावे. खालचा भाग चेरी सिरपमध्ये बुडवून त्यावर ताज्या क्रीमचे 1/3 भाग आणि काप केलेल्या चेरीचे तुकडे पसरावे. आता वरच्या भागालासुद्धा सिरपमध्ये बुडवून उरलेले क्रीम त्यावर पसरवावे. केकला चेरी आणि चॉकलेटने सजवावे. दोन तास थंडकरून सर्व्ह करावे.
पुढे पहा : चॉकलेट ब्राउनी केक

2. चॉकलेट ब्राउनी केक
साहित्य : 80 ग्रॅम मैदा, 130 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 80 मिली दूध, 60 ग्रॅम बटर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हेनिला इसेंस, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा कोको पावडर, 2 चमचा ब्राउन शुगर, 2 चमचा काळा रंग, 2 चमचा चॉको चिप्स, 30 ग्रॅम चॉकलेट. 
 
कृती : सर्वप्रथम क्रीम, बटर आणि कस्टर्ड मिल्क चांगल्याप्रकारे फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि इसेंस घालून परत एकदा फेटावे. नंतर त्यात दूध घालून मिश्रण एकजीव करावे. केकपात्राला तुपाचा हात लावून मैदा टाकावा आणि त्यावर हे मिश्रण ओतावे. 180 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. थंड झाल्यावर चॉकलेट सॉस आणि चॉको चिप्सने सजवून सर्व्ह करावी.
पुढे पहा : बनाना केक

3. बनाना केक
साहित्य : 2 केळी, 1 कप मैदा, दीड चमचा बेकिंग पावडर, चिमूट मीठ, 1/2 कप चेरी, 3/4 कप साखर, 1/2 कप बटर, दोन अंडी. 
 
कृती : सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर व मीठ चाळून घाला. त्यात साखर, बटर, अंडी, व केळ्यांचा लगदा करून त्यात मिक्स करावा. सर्व घालून मिश्रणाला एकाच दिशेने फेटून घ्या. केक टिनला बटरपेपर लावा. मिश्रण घालून मध्यम ओव्हनमध्ये बेक करा. केक हाताला स्पंजाप्रमाणे लागला व कडेनं सुटू लागला की झाला म्हणून समजावे, सर्व्ह करताना चेरी सजवून सर्व्ह करावा.
पुढे पहा : कोको केक

4. कोको केक
लागणारे जिन्नस: 3/2 कप मैदा, 2 अंडे, 1/2 कप कोको पाउडर, 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/2 कप दळलेली साखर, 1 कप दही.
 
करावयाची कृती:  मैदा, कोको पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मैदा गाळण्याच्या गाळणीने गाळून घ्या.  अंडे फोडून त्यात साखर आणि तेल टाकून हलके होईपर्यंत फेटा. आता त्यात मैद्याचे मिश्रण आणि दही टाका. पंचवीस ते तीस मिनिटे दोनशे सेंटीग्रेड तापमानावर बेक करा. केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
पुढे पहा : अपसाइड-डाउन केक

5.
साहित्य : मैदा 3 कप, बेकिंग पावडर 4 सपाट चमचे, तूप किंवा लोणी 1 वाटी, साखर 300 ग्रॅम, 4 अंडी, 1 कप दूध, व्हॅनिला इसेन्स 1 चमचा. अननसाच्या चकत्यांचा डबा, काजू, चेरी किंवा खजूर.
 
कृती : अननसाच्या चकत्या फडक्यावर दोन तास पसरून सुकत ठेवाव्यात. केकच्या भांड्याला नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी डालडा व मैदा लावतो, तसे न करता फक्त बाजूंनीच डालडा व मैदा लावावा. खाली फक्त डालडाच लावावा. नंतर अननसाच्या चकत्या भांड्याच्या तळावर एकमेकांना लागून बसवाव्यात. चकत्यांच्या मधील भोकांत चेरी किंवा खजूर यांपैकी कहीही भरावे व चकत्या सोड़न तो मोकळा भाग राहतो, त्यात काजूचे तुकडे भरावे. नंतर फाउंडेशन केकप्रमाणे मिश्रण तयार करून ते त्या चकत्यांवर ओतावे व ओव्हनमध्ये ठेवून केक भाजून घ्यावा. 
 
भांड्यातून केके काढून घेऊन डिशमध्ये ठेवताना खालची बाजू (म्हणजे अननसाच्या चकत्या असलेली) वर करून ठेवावी. अननसाच्या चकत्या व फळे यांच्यामुळे त्या बाजूवर चांगले डिझाइन दिसेल.
पुढे पहा : आमंड मारिया केक

6. आमंड मारिया केक
साहित्य - 100 ग्रॅम बदाम (काप केलेले), 125 ग्रॅम लोणी (वितळलेले), 1/4 चमचा बेकिंग सोडा, 275 ग्रॅम मैदा, 35 मिली. पाणी, 1 मोठा चमचा क्रीम, 275 ग्रॅम साखर,1 चमचा बेकिंग पावडर. 
 
कृती - साखर व पाण्याला एका सॉस पॅनमध्ये घालावे. मंद आचेवर तीन तारी पाक तयार करावा. पाकात लोणी घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे. मैदा, बेकिंग पावडर व सोड्याला चालून पाकमध्ये घालून एकजीव करावे. क्रीमसुद्धा फेटून त्यात घालावे. आता बदाम घालून तूप लागलेल्या केक पॉटमध्ये घालून 180 डिग्री सेंटीग्रॅडवर 30 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर वरून क्रीमाने सजवून सर्व्ह करावे.
पुढे पहा : रम केक

7. ख्रिसमस स्पेशल : रम केक
साहित्य : काजू 100 ग्रॅम, 50 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम गुलाब कतरी, 50 ग्रॅम ऑरेंज पील, 50 ग्रॅम चिरोंजी, 50 ग्रॅम खजूर, 50 ग्रॅम स्वीट जिंजर, 50 ग्रॅम काळ्या मनुका, 1/4 कप रम.
 
केकसाठी साहित्य : 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम मैदा आणि 6 अंडी. 
 
कृती : सर्वप्रथम केक तयार करण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व प्रकारच्या मेव्यांना बारीक कापून आवश्यकतेनुसार रममध्ये भिजत घालावे. एक मोठ्या भांड्यात अंडी फोडून त्यांना चांगल्याप्रकारे फेटून घ्या. आता त्यात साखर व मैदा घालून मिश्रणाला एकजीव करावे. नंतर त्यात रममध्ये भिजलेले सुके मेवा व 1/4 कप रम मिसळावी. मिश्रणाला परत एकजीव करावे. तयार मिश्रणाला तूप लावलेल्या केक पॉटमध्ये ओतावे. पॉटला गरम ओव्हनमध्ये 160 डिग्रीवर ठेवावे. 40-45 मिनिटापर्यंत केक बेक करावी व थंड झाल्यावर सावधगिरीने काढून घ्यावी. स्वादिष्ट रम तयार आहे.
पुढे पहा :जॅम-रोल केक

8. जॅम-रोल केक
साहित्य : 2 अंडी, चार चमचे मैदा, चार चमचे साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, जॅम, व्हॅनिला इसेन्स. 
 
कृती : अंड्यातील पिवळा भाग व साखर एकत्र करून फेसावे. मैद्यामध्ये बेकिंग पावडर मिसळून मैदा चाळणीने चाळून घ्यावा. त्या मैद्यात अंड्यातील पांढरा भाग, तसेच साखर व पिवळा भाग यांचे फेसून घेतलेले मिश्रण व इसेन्स घालून एकत्र कालवावे. तयार केलले मिश्रण केक पॅनमध्ये पाव इंच जाडीचे होईल, एवढे ओतावे व ओव्हनमध्ये ठेवून भाजून घ्यावे. भाजून झाल्यावर ओल्या फडक्यावर पॅन पालथे घालावे. केक सुटून आल्यावर त्यावर जॅम पसरावा व त्याचा रोल करावा. तो रोल तसाच पाच-दहा मिनिटे ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवावा. नंतर त्याच्या चकत्या कापून, त्या चकत्यांवर खावयास द्यावयाच्या वेळी हवे असल्यास आइसक्रीम अथवा कस्टर्ड तयार करून घालावे किंवा नुसतेच चेरी घालून डेकोरेशन करावे.
पुढे पहा : पाईनापल केक

9 . पाईनापल केक
साहित्य : 1/2 कप अननसाचे तुकडे वाफवलेले, 2 कप मैदा, चिमूटभर मीठ, 1/2 चमचा दालचिनी, जायफळ व लवंग पूड, 2 चमचे मनुका, 1 अंडे फेसून घेतलेले, वाफवलेल्या अननसाचा सिरप 4 चमचे. 
 
कृती : मैदा, मीठ, मसाल्याची पूड एकत्र चाळून घ्या. त्यात अननसाचे वाफवलेले तुकडे, बेदाणे घाला. सिरप व घुसळलेलं अंडं एकत्र करा व वरील मिश्रणात घाला. बेकिंग ट्रेमध्ये हे मिश्रण टेबल स्पूननं घाला. गोळ्यांमध्ये अंतर ठेवा. गोळे फार लहान नसावेत. त्यावर थोडी-थोडी साखर पेरा व वीस मिनिटं बेक करा. 
पुढे पहा : चेरी केक

10. चेरी केक
साहित्य : 3 वाट्या मैदा, 2 वाट्या साखर, 3 अंडी, 1 वाटी लोणी, पाव चमचा मीठ, 2 सपाट चमचे बेकिंग पावडर, लिंबाची किसलेली साल, 1 सपाट वाटी चेरीची फळे, भिजविण्यापुरते दूध.
 
कृती: साखर आणि लोणी एकत्र फेसून घ्यावे. नंतर त्यात अंड्यातील बलक घालून मिश्रण सारखे करावे. मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र मिसळून, चाळून घ्यावे. त्यात लिंबाची किसलेली साल घालावी व हे पीठ लोणी, साखर व अंडी यांच्या तयार करून घेतलेले मिश्रणात घालून हलक्या हाताने कालवावे. चेरीची फळे अर्धी कापून, त्या तुकड्यांना थोडास मैदा लावून, ते तुकडे वरील तयार मिश्रणात घालावेत व पुरेसे दूध घालून पीठ भिजवावे व सैलसर गोळा तयार करून घ्यावा. केकच्या भांड्याला आतून तुपाचा हात लावून वरीलप्रमाणे तयार केलेले पीठ त्या भांड्यात घालावे व भांडे ओव्हनमध्ये ठेवून मंद आचेवर केक भाजून घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती