गोड-धोड रेसिपी - चविष्ट गुलाबजामुन

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (16:40 IST)
जर आपल्याला काही गोड खाणं आवडत आहे तर गुलाबजामुन देखील नक्कीच आवडत असेल. प्रत्येक वेळी बाजारातून गुलाबजामुन आणणे परवडत नाही. आणि त्यामुळे मनाला देखील समाधान होत नाही. घरात गुलाबजामुन करताना तशी चव येत नाही. आज आम्ही आपल्याला गुलाबजामुन करायची सोपी विधी सांगत आहोत या पद्धतीने गुलाबजामुन तयार केल्यावर योग्य गुलाबजामुन बनतील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
1 किलो मावा किंवा खवा, 250 ग्रॅम मैदा,50 ग्रॅम किसलेले पनीर,100 ग्रॅम गोड फुटाणे,चिमूटभर खायचा सोडा,1 किलो साखर,1 किलो  तूप तळण्यासाठी.
 
कृती -
सर्वप्रथम चाशनी तयार करा. एक किलो साखर मध्ये दीड लिटर पाणी घाला आणि उकळू द्या,चाशनी एवढी शिजवा की त्याला तार पडू नये.
मावा,पनीर,मैदा आणि सोडा एकत्र करून मळून घ्या. जेणे करून त्यामध्ये गाठी राहू नये. मळलेल्या या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवा लक्षात  ठेवा की कणिक अशी मळून घ्या की एकदम मऊसर झाली पाहिजे जेणे करून त्या मध्ये गाठी पडू नये.
प्रत्येक गोळ्यात फुटाणे घाला. एका कढईत तूप गरम करायला ठेवा. गरम झाल्यावर गॅस मंद करा. तुपात गोळा सोडा. गोळे  तरंगू लागल्यावर सर्व गोळे तपकिरी रंगात तळून  घ्या,मंद आचेवर चाशनी मध्ये गुलाबजामुन घाला आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती