आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

Webdunia
शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
1 कप खजूर  
1/2 कप तीळ 
1/4 कप काजू किंवा बदाम
1चमचा तूप
1/2 चमचा वेलची पूड 
 
कृती- 
सर्वात आधी तीळ एका पॅनमध्ये भाजून घ्यावी. आता त्याच पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खजूर भाजून घ्यावे.खजूर नरम झाले की समजावे ते शिजले आहे. आता त्या खजुरामध्ये भाजलेली तीळ आणि काजू बदाम घालावे. व चांगल्या प्रकारे हे मिश्रण मिक्स करावे. आता एका प्लेटला तूप लावून घ्यावे. व हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यावे.  व व्यवस्थित पसरवून घ्यावे. आता थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने याच्या वड्या कापून घ्याव्या. तर चला तयार आहे आपली खजूर आणि तिळाची चिक्की रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

पुढील लेख