ब्रेड पुडिंग कृती
ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी आधी ब्रेड बारीक करुन घ्या.
आता एका भांड्यात अंडी, दूध, साखर आणि 1 चिमूट मीठ मिक्स करा.
तुम्ही त्यात दालचिनी पावडर आणि व्हॅनिला इसेन्स देखील घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.
आता हे मिश्रण एका बेकिंग ट्रेमध्ये ठेवा आणि ओव्हनमध्ये 45 मिनिटे बेक करा.
पुडिंग बेक झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या आणि त्यानंतर पुडिंगला व्हीप्ड क्रीमने सजवा.
मस्त गोड पदार्थ तयार आहे, फ्रीजमध्ये थंड केल्यावर खाऊ शकता.