जॅम-रोल केक

साहित्य : 2 अंडी, चार चमचे मैदा, चार चमचे साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, जॅम, व्हॅनिला इसेन्स.

कृती : अंड्यातील पिवळा भाग व साखर एकत्र करून फेसावे. मैद्यामध्ये बेकिंग पावडर मिसळून मैदा चाळणीने चाळून घ्यावा. त्या मैद्यात अंड्यातील पांढरा भाग, तसेच साखर व पिवळा भाग यांचे फेसून घेतलेले मिश्रण व इसेन्स घालून एकत्र कालवावे. तयार केलले मिश्रण केक पॅनमध्ये पाव इंच जाडीचे होईल, एवढे ओतावे व ओव्हनमध्ये ठेवून भाजून घ्यावे. भाजून झाल्यावर ओल्या फडक्यावर पॅन पालथे घालावे. केक सुटून आल्यावर त्यावर जॅम पसरावा व त्याचा रोल करावा. तो रोल तसाच पाच-दहा मिनिटे ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवावा. नंतर त्याच्या चकत्या कापून, त्या चकत्यांवर खावयास द्यावयाच्या वेळी हवे असल्यास आइसक्रीम अथवा कस्टर्ड तयार करून घालावे किंवा नुसतेच चेरी घालून डेकोरेशन करावे.

वेबदुनिया वर वाचा