"एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या"

सोमवार, 26 जुलै 2021 (14:42 IST)
"एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या" विचार केला तर ही एक व्यापारी व्यवस्था वाटते पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे.
 
जर आपण राग विकत घेतला तर आपल्याला एसिडिटी (बद्धकोष्ठता) फुकट मिळते.
जर आपण ईर्ष्या विकत घेतली तर आपल्याला डोकेदुखी फुकट मिळते.
जर आपण द्वेष विकत घेतला तर आपल्याला अल्सर (पोटदुखी) फुकट मिळते.
जर आपण ताणतणाव विकत घेतला तर आपल्याला रक्तदाब (BP) फुकट मिळतो.
अशाप्रकारे आपण वार्तालाप (बोलचाल) करून विश्वास विकत घेतला तर आपल्याला मैत्री दोस्ती फुकट मिळते.
जर आपण व्यायाम कसरत विकत घेतला तर आपल्याला निरोगी आयुष्य फुकट मिळते.
जर आपण शांती विकत घेतली तर आपल्याला समृद्धी फुकट मिळते.
जर आपण ईमानदारी प्रामाणिकपणा विकत घेतला तर आपल्याला झोप फुकट मिळते.
जर आपण प्रेमभाव विकत घेतला तर आपल्याल्यावर सद्गुण सदाचारासह सद्गुरू कृपा सहज प्राप्त होते.
 
हे सर्व आपल्याल्यावर अवलंबून आहे की आपण काय विकत घेतलं पाहिजे. जर आपण सत्संग विकत घेतला तर आपल्या मनास फुकट मिळेल विश्रांती आणि समाधान. 
 
म्हणूनच समर्थ म्हणतात 
हे सकळ आपणापाशी गती। 
सगुण भाग्यश्री भोगिती।।
अवगुणास दारिद्र्य प्राप्ती। 
यदर्थी संदेह नाही।।
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती