सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडली 22 हजारांची पातळी

सोमवार, 10 मार्च 2014 (15:54 IST)
मुंबई- मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशंकाने पहिल्यांदा हजारांची पातळी ओलांडल्याने गुंतवणूदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले  आहे.सोमवारी बाजार उघडताच सव्वा दहाच्या सुमारास निर्देशांकाने 22 हजारांची पातळी ओलांडून  22,005.54 नवा ठप्पा  गाठला. दरम्यान,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून शेअर बाजाराचा निर्देशांकात वाढ होत आहे.
 
बॅंकिंग, ऑईल, गॅस  आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्संना गुंतवणूकदाची मोठी मागणी असल्याचे सोमवारी दिसून आले. बीएचइएएल,  रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एल अॅण्ड टी, एचडीएफसी बॅक यांच्या शेअर्संना मोठी मागणी असल्याने शेअर्सचे भाव  वधारल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा