शेअर बाजारात किरकोळ घसरण

दिवसभर सापशिडीचा खेळ खेळणाऱ्या मुंबई शेअर बाजारात आज किरकोळ घसरण दिसून आली. बीएसई 76 अंशांनी घसरत 16974 अंशांवर तर निफ्टी 10 अंशांनी घसरत 5051 अंशांवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात किरकोळ वाढ दिसून आली. डीएलएफच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक तेजी दिसून आली. निफ्टीत घसरणाऱ्या शेअर्समध्ये एल एंण्ड टी, सेल, ग्रासीम यांचा समावेश होता.

आशियाई बाजारात पडझड झाल्याने आणि गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि बीएसईचा निर्देशांक 18 अंशांनी तर निफ्टी 4 अंशांनी वधारत बंद झाला होता.

आज बाजाराला सुरुवात झाल्यानंतर यात सातत्याने चढ-उतार दिसून आले. अखेरीस बाजारात किरकोळ घसरण झाली.

वेबदुनिया वर वाचा