Vaginal Cleaning Tips योनी स्वच्छ कशी ठेवावी

सोमवार, 6 मार्च 2023 (12:31 IST)
तुमचे शरीर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला साबण किंवा बॉडी वॉश आवश्यक असतं पण तुमची योनी स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त काही प्रॉडक्ट्सची गरज नसते. कारण मुळात तुमची योनी संवेदनशील आहे आणि रसायनांनी भरलेले साबण योनीच्या pH पातळीसाठी नुकसानदायक ठरु शकतात. यामुळे संसर्ग, दुर्गंधी किंवा खाज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कदाचित तुम्ही अजूनही गोंधळलेले असाल किंवा तुमची योनी कशी स्वच्छ करावी हे माहित नसेल तर जाणून घ्या-
 
योनी कशी धुवायची? हा प्रश्न असेल तर खरं तर तुम्हाला तुमची योनी धुण्याची गरज नाही कारण योनीमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची शक्ती असते. त्यामुळे त्याची किमान काळजी घेणे आवश्यक आहे. पण योग्य मार्गाने कारण लहानशा चुकीमुळेही संसर्ग किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.
 
योनी धुण्याची योग्य पद्धत काय - 
1. योनी स्वच्छ करण्यासाठी फक्त कोमट पाणी वापरा.
 
2. योनीमध्ये काहीही घालू नका. योनी हा शरीराच्या आत जाणारा मार्ग आहे.
 
3. आत काहीही जाऊ नये, अगदी पाणीही नाही.
 
4. स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुमच्या बोटांच्या मदतीने योनीभोवतीची घाण काढू शकता.
 
5. क्लिटोरल हुड स्वच्छ करा.
 
6. काहीही असो तुमचे बोट आत घालू नको.
 
7. तुम्ही तुमच्या कूल्हेभोवती स्वच्छ करू शकता कारण ते महत्वाचे आहे.
 
तसेच तुमची योनी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा - 
 
1. सुगंधित साबण आणि सुगंधित इंटिमेट वॉश टाळा.
 
2. योनीमार्गाच्या ओपनिंगला साबणापासून दूर ठेवण्याची खात्री करा.
 
3. स्वच्छ करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा कारण ते बॅक्टेरिया मारण्यास मदत करतं.
 
4. जिवाणू दूषित होण्याचा धोका टाळण्यासाठी समोरपासून मागे धुवा.
 
5. डूशिंगला टाळा.
 
6. साटन, सिल्क आणि पॉलिस्टर सारख्या फॅब्रिक पँटीज घालणे टाळा. त्याऐवजी सुती कपड्याच्या पँटीज वापरा आणि नियमितपणे बदला.
 
7. दिवसातून तीन दा तरी पँटीज बदला. 
 
8. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. योनीची पीएच पातळी राखण्यासाठी हायड्रेशन महत्वाचे आहे.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटिमेट वॉश वापरु नका. याची खरं तर गरज नसते कारण योनीमध्ये आपोआप स्वच्छता करण्याची शक्ती असते. त्यामुळे त्याची स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी वापरणे पुरेसे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती