घरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय

घरात पाल फिरताना दिसली की किळस वाटते, मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात पडून गेली तर... बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड मिळत असले तरी ते लहान मुलं आणि पाळीव जनावरांसाठीही धोकादायक असतात. अशात पाल पळविण्यासाठी काही घरगुती उपाय करावे. पाहू काही असेच सोपे उपाय: 
कॉफी पावडर आणि तंबाखू पावडर मिसळून घ्या. याच्या लहान-लहान गोळ्या तयार करून तिथे ठेवा जिथे पाली येतात. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पाली मरतील किंवा पळून जातील.
 

पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो म्हणून त्या पळतात. घरात प्रत्येक कमर्‍यात मोरपंख ठेवा. 
नेफ्थलीनच्या गोळ्या वार्डरोब, वॉश बेसिन व इतर कोपर्‍यांमध्ये ठेवाव्या. अश्या ठिकाणी पाल येणार नाही.
 

कांदा कापून लाइटजवळ लटकवावा. याच्या तीक्ष्ण गंधामुळे पाली पळतात.
पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्‍यामध्ये शिंपडा. या तीक्ष्ण वासामुळे पाली पळतात.  

अंड्याची साले लटकवून किंवा कोपर्‍यात ठेवल्याने पाल येत नाही. 
लसणाच्या पाकळ्या ठेवल्याने पण पाली पळतात. तसेच कांदा आणि लसणाचा स्प्रे तयार करून कोपर्‍यात शिंपडू शकतात. 

वेबदुनिया वर वाचा