लॉक डाऊन काळात सासू-सून नातं दृढ करण्यासाठी हे करा

मंगळवार, 25 मे 2021 (19:53 IST)
मागच्या लॉक डाऊन मध्ये घरातील सर्व सदस्य मिळून मिसळून राहायचे. यंदाच्या वर्षी लागलेल्या लॉक डाऊन मुळे घरातील सर्वच सदस्य कंटाळले आहे. अशा मध्ये सासू-सून वाद घरा-घरात होत आहे. हे टाळण्यासाठी आणि सासू-सून नातं दृढ करण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत.चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* कामाची वाटणी करून घ्या- घरातील कामे सकाळीच वाटून घ्या. असं केल्याने कोणा एकावरच त्याचा भार पडणार नाही आणि रुसवे -फुगवे देखील होणार नाही.असे कामे ज्यांना सासूबाई आपल्या वयामुळे करू शकत नाही आपण करून घ्यावे. 
 
* एकटे सोडू नका- हा काळ असा आहे की प्रत्येक जण वैतागला आहे ,स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना घेऊन काळजी वाटतच राहते. दिवसातून काही वेळ एकमेकींसाठी काढा.आपल्या सासू ला धीर द्या.समजावून सांगा की आपण कायम त्यांच्या सोबतीला आहे.  
 
* त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या- सध्या स्वतःची आणि आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.आपण आपल्या आईप्रमाणेच त्यांची देखील काळजी घ्या.असं केल्याने आपल्यातील नाते दृढ होईल. 
 
* काहीही मनावर घेऊ नका- बऱ्याच वेळा मोठ्या माणसांची सवय असते की त्यांना जे आवडत नाही त्यासाठी ते लहानांना रागावतात. आपल्या सासूची पण अशी काही सवय आहे तर त्यांचे रागावणे मनावर घेऊ नका.लक्षात ठेवा की आपल्या घरात आपले आई-वडील देखील रागवायचे त्यांचे रागावणे देखील आपण काही मनावर घेत नसायचो. त्याच प्रमाणे सासूचे देखील बोलणे किंवा रागावणे मनावर घेऊ नका.असं केल्याने आपल्यातील नातं अधिक दृढ होईल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती