हवामानात अचानक झालेल्या बदलाचा प्रभाव लहान मुलांवर सर्वाधिक पडतो. इतर ऋतुंच्या मानाने हिवाळ्यात मुले ताप, सर्दी, खोकला, अस्थमा, कफ आदी आजारांच्या घेर्यात सापडतात. या हिवाळ्यात आपण आपल्या पाल्याच्या तब्बेतीची वेळेत काळजी घेतली पाहिजे.
हिवाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या कपडयापर्यंत बदल करणे आवश्यक असते. मुलांना आंबट व थंडगार पदार्थ खाण्यास देऊ नये. हिवाळा म्हणजे तब्बेत कमावण्याचा ऋतू आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दररोजच्या आहारात सुकामेवा, फळ, दूध आदींचा समावेश करावा.
हिवाळ्यात थंडगार हवेपासून बचावासाठी व शरीर गरम ठेवण्यासाठी मुलांची तेलाने मालिश करणे गरजेचे असते. अंघोळीआधी मुलांची तेलाने मालिश करावी. त्यानंतर त्याला काही वेळ कोवळ्या उन्हात धरावे. कोमट पाण्याने त्याची अंघोळ घालून, कपडे परिधान करुन पुन्हा उन्हात बसवावे. त्याने 'ड' जीवनसत्व मिळत असते.
बदलत्या हवामानानुसार आपल्या खाण्यापिण्यातही बदल केला पाहिजे. मुलांना उकाळून गार केलेले पाणी पिण्यास दिले पाहिजे. हिवाळ्यात मुले पाणी पिण्याचे नखरे करतात. शरीरास योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलांना दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजले पाहिजे.
WD
WD
मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. इनर, स्वेटर, स्लेक्स, हातापायात मोजे हा सेट हिवाळ्याच्या सुरवातीला तयार ठेवणे आवश्यक असते. लक्षात ठेवा:- * हिवाळ्यात मुलांना दुपारी फिरायला न्यावे. * स्वेटर, टोपी घालावी कारण त्यामुळे बाळाच्या त्वचेवर उन्हाचा काही परिणाम होणार नाही. * मुलांना विजेवर चालणार्या उपकरणांपासून दूर ठेवावे.