परंपरा जोपासावी लागते आदराने

सोमवार, 19 एप्रिल 2021 (16:23 IST)
परंपरा जोपासावी लागते आदराने,
द्यावा लागतो वेळ, आठवावी श्रद्धेने,
खूप असतात चांगल्या गोष्टी त्यातून घेण्यासाठी,
अपार कष्ट घ्यावे लागतात त्या जपण्यासाठी,
मार्गक्रमण होते सुकर,वाट होते सोपी,
एक विरासतीचा ठेवा असतो बहुरूपी,
कित्येक पिढ्या खपतात जिथं मूल्य जोपासायला,
अभिमानाने उर होतो मोठा, ते बघायला!
देतो विश्वास, करतो आम्ही प्रतिज्ञा अशी,
जपू परंपरा आमची, पवित्र होती तशी!
...अश्विनी थत्ते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती