प्रत्येक नातं जपावं न ते आहे तसं,
जगून घ्यावं न ते, ते आहे जसं,
कृत्रीम पणा नकोच त्या जगण्यात,
आहे तसेच स्वीकारलं, की आनंद स्वीकारण्यात,
आहे त्यास बदलवल ,की गोडवा निघून जातो,
नात्यांचा चोथा मात्र आपल्या हाती लागतो,
कारण नाती निवडता येत नाहीत,
ते प्रारब्धात आहे तेच तर संचित,
खुलवलं त्यास की ते खुलतात खूपच,
नाहीतर अंतर्मुख होतात,होतात गूढ उगाच.
बघा काय जमतं तुम्हांस, काय करू शकता,
जमवायचं ठरवलं की सगळेच सर्व करू शकता!..